अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात अनलॉकची घोषणा करण्यात आली. मात्र लॉकडाऊनच्या शिथीलते नंतर होणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे.
करोना अद्याप संपलेला नाही म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे तालुका व शहरातील करोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नामदार थोरात म्हणाले, करोना हा अदृश्य शत्रू आहे.
तो कोणत्याही रुपाने मानवी शरीरात प्रवेश करतो. दुसर्या लाटे नंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले असले तरी कोणीही निष्काळजीपणा करू नका.
काही शास्त्रज्ञांच्या मते तिसरी लाट येऊ शकते म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे. कोणाला लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घ्या.
लक्षणे असणार्यांचे विलगीकरण करा. ट्रेसिंग, टेस्टिंग, आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करून जास्तीत जास्त गावे पूर्ण मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे.
संगमनेर तालुक्यात सध्या 81 गावे करोना मुक्त झाली असून संपूर्ण तालुका लवकरात लवकर करोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी निर्बंध शिथिल झाले असले तरी अत्यंत काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम