अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- नेवासा तालुक्यातील माका ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नाथा विश्वनाथ घुले यांचे विरुद्ध 14 पैकी 11 सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
तो अविश्वास प्रस्ताव अखेर फेटाळला गेला आहे. माका ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नाथा घुले यांच्यावर अकरा सदस्यांनी नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे सरपंच घुले यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
त्या नुसार आज माका ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत अविश्वासाची प्रक्रिया होऊन त्यामध्ये आदिनाथ रामभाऊ मस्के, रमेश निवृत्ती कराळे, सौ.कमलबाई मुरलीधर लोंढे, सौ.सुशिलाबाई खंडेराव गुलगे,
सौ. शोभाबाई गोरक्षनाथ घुले हे फक्त पाचच ग्रामपंचायत सदस्य हजर राहिले. तर सुदाम नामदेव घुले, देविदास जयवंत भुजबळ,
सौ.सुमन अर्जुन घुले,सौ.आशाबाई दिगंबर शिंदे, सौ.उषाबाई सत्यवान पटेकर, दिगंबर तुकाराम आखाडे, सौ.वनिता दिगंबर फलके,सौ. जयश्री ज्ञानेदव सानप हे आठ ग्रामपंचायत सदस्यांनी गैरहजर राहून सरपंच घुले यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सरपंच घुले यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळला गेला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम