आता खिशाला बसणार झळ ; एटीएममधून पैसे काढणे महागणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- एटीएममधून पैसे काढताना आता ग्राहकांना 20 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. आरबीआयने सर्व बँकांना एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे.

यापुढे फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रांझॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. तर अन्य बँकेतील चारहून अधिक व्यवहारासाठी 15 रुपयांऐवजी 17 रुपये शुल्क भरावे लागेल.

वाढीव शुल्करचना 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. तसेच गैर आर्थिक ट्रांझॅक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये केली आहे.

दरम्यान आरबीआयचा हा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे. तसेच एका आर्थिक वर्षात खातेधारकास बॅंक 10 पानी चेकबुक देईल.

त्यानंतर चेकबुक करता एसबीआय शुल्क आकारणार आहे. 10 पानी चेकबुक 40 रुपये आणि जीएसटी शुल्क २५ पानी चेकबुक 75 रुपये आणि जीएसटी शुल्क 10 पानी आपत्कालीन चेकबुक 50 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारले जाणार.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!