चोरटयांनी भरदिवसा घरातून सात तोळे सोने लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर फोफावत चालली आहे. दरदिवशी चोरी लुटमारी आदी घटना घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरलीय.

मात्र या चोरट्यांना पायबंद घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. नुकतेच पारनेर मध्ये एक चोरीची घटना नोंदवण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यातील पाटेगावजवळील वाघनळी येथे अज्ञात चोरट्यांनी सागर बबन पवार यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाटातील सुमारे 7 तोळे सोने व इतर मुद्देमाल लंपास केला.

कुटुंबातील सर्व सदस्य शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी जेवणाच्या वेळेस घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजाची कडी तोडलेली दिसली.

घरातील कपाटाचे लॉकर तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. पाहणी केली असता ऐवज लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पवार यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe