अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- शहर चोही बाजूंनी वाढत असतांना शहरातील मध्य वस्तीत असलेले विरंगुळास्थान सिद्धीबाग हे स्थान स्व.कृष्णाभाऊ जाधव आणि सध्या धनंजय जाधव यांनी या परिसराकडे चांगले लक्ष दिल्याने परिसर व्यवस्थित राहिला.
त्याच्या नूतनीकरणासह सुशोभीकरणासाठी धनंजय जाधव यांनी कंबर कसली असून लवकरच या सिद्धीबागेचा कायापालट झालेला पाहायला मिळेल. मत्स्यालय नूतनीकरणाने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
आ.जगताप आणि माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धीबागेतील नूतनीकरण केलेल्या मत्स्यालयाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी आ.जगताप बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते,नेते बाळासाहेब जगताप, डॉ.बहुरूपी,मत्स्यालय नूतनीकरणाचे प्रायोजक उद्योजक निखिल लुणिया, इंजि. प्रताप काळे , डॉ. विक्रम पानसंबळ, जंगूभाई तालीम मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू मामा जाधव,डॉ . आदिती पानसंबळ , साहेबान जहागीरदार आदी व्यासपीठावर उपस्थीत होते.
जुन्या नगरपालिकेत विकासाची दृष्टी असलेले जे काही जुने नगरसेवक होते कृष्णाभाऊ जाधव हे त्यापैकी एक होते . त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि विकासाचे विचार ह्यामुळे सिद्धीबागेसह परिसर त्यांनी कोणतेही अतिक्रमण होऊ न देता जतन केला. तोच वारसा धनंजय जाधव पुढे चालवत आहेत असेही आ. जगताप यांनी सांगितले.
शहरातील सुशोभीकरणाच्या कामांसाठी आमदार निधी तसेच खासगी उद्योजकांकडून प्रायोजकत्व घेऊन विकास कामांना सुरवात केली आहे. या मत्स्यालयाच्या नूतनीकरणापासून त्याची सुरवात केली आहे. सिद्धीबागेच्या सुशोभीकरणासह विकास याच माध्यमातून केला जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक ॲड, धनंजय जाधव यावेळी म्हणाले, राजकारण विरहित आमची मैत्री असून शालेय जीवनापासून आम्ही एकत्र आहोत .
राजकारण करत असतांना समाजकारणाला प्राधान्य देत असून विकासकामांच्यासाठी आम्ही एकमेकांबरोबरच आहोत. सिद्धीबाग सुशोभीकरणाच्या प्रस्ताव दिलेला असून सुशोभीकरणानंतर या बागेचा कायापालट होऊन शहरातील कापडबाजार , आनंदधाम , प्रोफेसर चौक सारख्या चौपाटी शहराच्या मध्यवस्तीत सिद्धिबागेत सुरु होईल.
यानिमित्ताने सिद्धिबागेत लोकांची गर्दी होईल, अनेकांना रोजगार मिळेल आणि या निमित्ताने बागेत लहानमुलांसह परिवार , वृद्ध अश्या सर्वांचे आकर्षण ठरेल आणि सिद्धिबागेला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. उपमहापौर मालनताई ढोणे,उध्यानविभाग प्रमुख मेहेर लहारे यांचे रंगकामासाठी सहकार्य लाभले . यावेळी प्रा.विधाते, साहेबानं जहागीरदार आदींची समयोचित भाषणे झाली.
स्वागत व प्रास्तविक राजेश सटाणकर यांनी केले. सर्वश्री अमोल खोले, सारंग पंधाडे, अशोक तुपे, भूपेंद्र रासने,विनायक नेवसे , ,आनंद पुंड ,कैलास शिंदे ,राजेंद्र बोगा ,चेतन आरकल, स्वप्नील दगडे, स्वप्नील मुनोत, तुषार चोरडिया आदी उपस्थितीत होते.शेवटी राहुल मुथा यांनी आभार मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम