आमदार संग्राम जगताप यांचा जनसेवक सन्मानाने गौरव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात शहरात गंभीर परिस्थिती उद्भवली असताना सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देऊन आधार देण्याचे कार्य केल्याबद्दल चितळेरोड हातगाडी व भाजीविक्रेता संघटनेच्या वतीने जनसेवक सन्मानाने आमदार संग्राम जगताप यांचा गौरव करण्यात आला.

तर चितळे रोड येथील भाजी विक्रेत्यांना भांडे (स्टीलचे डबे) वाटप करण्यात आले. चितळे रोड येथे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा होते.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, उपाध्यक्ष शरद मडूर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, शुभम झिंजे, कार्याध्यक्ष अरुण खिची, बाळासाहेब जगताप, उबेद शेख, अरविंद शिंदे, दीपक सुळ, संतोष गुगळे, संतोष पोखरणा, अमित खामकर, राजूमामा जाधव, सुनिल काळे, राजेंद्र पडोळे, आनंद पुंड, डॉ. कवडे, दुर्गा खिची, श्रीदेवी आरगोंडा आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात संजय झिंजे म्हणाले की, आमदार म्हणून नव्हे तर जनसेवक म्हणून संग्राम जगताप यांनी कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना धीर दिला. कोरोना रुग्णांना उपचार, ऑक्सिजन बेड व औषधे मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले होते. अशा परिस्थितीमध्ये नगरकरांना त्यांनी आधार देण्याचे कार्य केल्याचे सांगितले.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात भाजी विक्रेत्यांवर निर्बंध घालण्यात आल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. मात्र संघटनेच्या वतीने पाठपुरावा करुन हातावर पोट असलेल्या भाजी विक्रेत्यांचा प्रश्‍न सोडविण्यात आला. सर्वसामान्यांच्या हितासाठी जो कार्य करतो त्याला जीवनात काही कमी पडत नाही.

तर आलेले संकट देखील टळतात. जनहितासाठी केलेल्या कामाची दखल घेतली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध शिथील होण्यासाठी नगरमधून चालविण्यात आलेल्या चळवळीची दखल वरिष्ठ स्तरावर घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुभाष गुंदेचा यांनी संकटकाळात शहराला आधार देणारा आमदार शहराला लाभला. कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना, शासनस्तरावर पाठपुरावा करुन व जनतेत मिसळून खांद्याला खांदा लाऊन आमदार संग्राम जगताप यांनी कार्य केले.

शहराचे प्रश्‍न सोडवून विकासात्मक दिशेने घेऊन जाणार्‍या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून बदल घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी सर्वसामान्यांचा आधार देत आमदार जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन सुरेखा शेकटकर यांनी केले. आभार शुभम झिंजे यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe