दर्जामध्ये तडजोड खपवून घेणार नाही : आ. लहू कानडे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  श्रीरामपूर व वैजापूर या तालुक्यांना जोडला जाणारा हा रस्ता शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. १४ किलोमीटर लांबीचा हा राज्यमार्ग हरेगाव फाटा ते उंदिरगाव व त्यापुढे नाऊरपर्यंत दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे.

उंदिरगाव ते नाऊर रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता राज्य सरकारने आर्थिक तरतूद केली आहे. रस्त्याचे काम दर्जेदार केले जाणार आहे. रस्त्यांकरिता वारंवार निधी मिळत नाही. त्यामुळे दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले आहे.

शहरेगाव ते नाऊर या रस्त्याचे त्याकरिता काम हाती घेतले असून हा रस्ता भविष्यात चौपदरी केला जाईल, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. हरेगाव ते नाऊर या राज्यमार्ग क्रमांक ५० च्या तीन कोटी ५७ लाख रुपये खर्चाच्या दुरुस्ती कामाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी हरेगाव येथे पार पडला.

यावेळी आमदार कानडे बोलत होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, काँग्रेसचे नेते ज्ञानदेव वाफारे, पोलिस निरीक्षक संजय सानप, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, इंद्रनाथ थोरात,

अंकुश कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण नाईक, अ’ड.समीन बागवान, विष्णुपंत खंडागळे, अॅड. सर्जेराव कापसे, उपअभियंता नितीन गुजारे, उपसरपंच चेतन त्रिभुवन, मेहबूब शेख, सतीश बोर्डे, सुरेश पवार, अशोक कानडे,

राजू औताडे, रमेश आव्हाड, रवी जाधव, निखिल वाबळे, महेबूब शेख, उपसरपंच चेतन त्रिभुवन, तुकाराम गाडेकर, रसुल पठाण आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News