अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- प्रेमासाठी मजनू आशिक काहीही करायला तयार होत असल्याचे तुम्ही अनेक सिनेमामध्ये पहिले असेल. अशीच एक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.
औरंगाबाद येथील एका विवाहित महिलेने आपल्या सोबतच लग्न करावे याकरिता तिच्या सहा महिन्याच्या वर्षाच्या मुलाचे अपहरण करून कार मधून घेऊन चाललेल्या एका व्यक्तीला श्रीगोंदा पोलिसांनी नगर दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा येथे अटक केली.
सागर आळेकर असे आरोपीचे नाव असून विवाहितेच्या मुलाची आरोपीच्या ताब्यातून सुटका करून मुलाला आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर आळेकर याच्या विरोधात एम.आय.डी. सी. वाळुजनगर औरंगाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समजलेली अधिक माहिती अशी, आरोपी विवाहितेने आपल्याशी लग्न करावे यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता.
मात्र, ती त्याला नकार देत होती. शेवटी त्याने ‘लग्न कर, नाही तर मुलाला पळवून नेईन,’ असे धमकावले. मात्र तरीही महिला लग्नास तयार न झाल्याने सागर याने पीडितेच्या सहा वर्षां मुलाचे अपहरण केले. त्याला पळून घेऊन येत असताना
मुलाच्या वडिलांनी आरोपीच्या गावाचा विचार करून नगर व श्रीगोंदा पोलिस स्टेशन कल्पना दिली. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप
तेजनकर पोलिस काॅस्टेबल रमेश जाधव अंकुश ढवळे किरण बोराडे दादा टाके प्रकाश मांडगे गोकुळ इंगवले यांनी पारगाव फाट्यावर नाकेबंदी करुन सागर आळेकर याला पकडले. त्याची स्विफ्ट कार जप्त केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम