अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून मानवी वास्तवीवर बिबट्याचा वावर पुन्हा वाढू लागला आहे. यातच श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे शेळीवर झडप घालून तिला उचलून नेत असताना शेळीसह बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती.
दरम्यान वन विभागाच्या अधिकार्यांनी बिबट्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर खुर्द येथील शेतकरी रमेश निवृत्ती भगत यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने झडप घालून
शेळीला उचलून नेण्याच्या प्रयत्न केला. या नादात विहिरीचा अंदाज न आल्याने शेळीसह बिबट्या विहीरीत पडला. भगत व त्यांच्या कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विहिरीत बाज सोडून शेळीला बाहेर काढले व त्यानंतर वन विभागाला याची कल्पना दिली.
त्यानंतर कोपरगावचे वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. मध्यरात्रीच बिबट्यालात्यांनी बाहेर काढले. त्याला पिंजर्यात जेरबंद करण्यात आले. त्यानंतर त्याला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम