आ.रोहित पवारांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड शहर होणार सुरक्षित !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- आ.रोहित पवारांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प’ राबवण्यासाठी ६ कोटी ३७ लक्ष रुपयांच्या खर्चास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

त्यामुळे या शहरांच्या अंदाजे ४९ स्थळांवर सुमारे १२० सीसीटीव्ही कमेरे व १३ पब्लिक अॅड्रेस सिस्टीमची करडी नजर राहणार आहे.उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पामध्ये व्हिडीओ सर्व्हीलन्स सिस्टीम,पब्लिक अॅड्रेस सिस्टीम इत्यादींचा सामावेश असणार आहे.त्यामुळे शहरांची कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्याबरोबरच वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

सार्वजनिक सुरक्षितता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे,धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण,वाहतूक नियंत्रण तसेच शहरातील संवेदनशील भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा फारच प्रभावी काम करणार आहे.

गुन्हेगारी घडू नये,महिलांवर अत्याचार होऊ नये,पोलीस बांधवांचे प्रश्न सोडवणे यासाठी कायम आग्रही असलेल्या आ.रोहित पवारांची ही संकल्पना कर्जत व जामखेडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाला दुवाच ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe