अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- विवाहाचे किमान वय आता मुली व मुलांसाठी २१ वर्षे करण्यासंबंधी कृती दलाच्या अहवालावर नीती आयोगाच्या दोन बैठका झाल्या आहेत.
याची घोषणा पंतप्रधान लाल किल्ल्यावरून करू शकतात. गेल्या वेळी पंतप्रधानांनी या वयामध्ये बदल करण्याचा विचार करू, अशी घोषणा केली होती.

मुली-मुलांच्या विवाहाचे वय सारखे असेल. सिगारेट-तंबाखू सेवनाचे किमान वय वाढेल. मद्यपानासाठी देशभर वयाची अट एकसारखीच असावी यासाठी केंद्र व राज्यांचे निर्णय कायदेशीर अधिकारात आणले जातील.
इंटरनेटवर सर्फिंगसाठीही मुलांचे वय निश्चित केले जाईल. डेटा प्रोटेक्शन विधेयकात इंटरनेट वापरकर्त्या मुलांसंबंधी व्याख्या, समितीचा अहवाल तयार डेटा प्रोटेक्शन विधेयकावर संसदेच्या संयुक्त समितीच्या अहवालास अंतिम रूप दिले जात आहे.
अनेक प्रकरणांत किमान वय काय असावे, याचा आगामी काळात निर्णय घेण्याची तयारी सरकारने चालवली आहे. त्यामुळे तरुण लोकसंख्येसाठी वयाचे नवे निकष असतील.
मुली-मुलांच्या विवाहाचे वय सारखे असेल. सिगारेट-तंबाखू सेवनाचे किमान वय वाढेल. मद्यपानासाठी देशभर वयाची अट एकसारखीच असावी यासाठी केंद्र व राज्यांचे निर्णय कायदेशीर अधिकारात आणले जातील.
इंटरनेटवर सर्फिंगसाठीही मुलांचे वय निश्चित केले जाईल. डेटा प्रोटेक्शन विधेयकात इंटरनेट वापरकर्त्या मुलांसंबंधी व्याख्या, समितीचा अहवाल तयार डेटा प्रोटेक्शन विधेयकावर संसदेच्या संयुक्त समितीच्या अहवालास अंतिम रूप दिले जात आहे.
दरम्यान इंटरनेट सर्फिंगसारठी लहान मुले कुणाला मानायचे हे यात ठरेल. इतर अनेक प्रकरणांत मुलांची व्याख्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले अशी आहे.
मात्र, अमेरिका व युरोपातील अनेक देशांत १३ वर्षांवरील मुलांना सज्ञान मानले गेले आहे. भारतात सोशल मीडिया कंपन्यांनीही संसदीय समितीसमोर हाच तर्क मांडला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम