जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात सभागृृहात होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- ऑफलाईन च्या गोंधळात अडकलेली झेडपीची सर्वसाधारण सभेचा मार्ग मोकळं झालाअसून आता हि सभा आता तब्बल दीड वर्षानंतर प्रत्यक्षात सभागृृहात होणार आहे.

या सभेत दीड वर्षानंतर सदस्यांना प्रत्यक्षा प्रश्‍न उपस्थित करून त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे.

अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी, सदस्य हजर राहणार आहेत.

या सभेत जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाचे पुर्ननियोजन करण्यात येणार असून त्यानंतर सुधारित बजेटला मान्यता देण्यात येणार आहे. यासह अन्यविषयांसह ऐनवेळी येणार्‍या विषयांवर चर्चा होणार आहे.

यात जिल्हा परिषदेच्या जागा अन्य शासकीय संस्थांना देणे, नोंव्हेंबर महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा रखडलेला शालेय पोषण आहाराचा विषय, जिल्हा परिषद शाळा खोल्यांची मंजूरी, यास अन्य विषयांचा यात समावेश राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe