अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील विभागामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस नाईकास वाळू वाहतूक करणाऱ्या
वाहनावर कारवाई न करण्यासाठी फिर्यादी याचे कडून उपस्थित पंचासमक्ष २० हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.
भाऊसाहेब संपत सानप (वय—४४, राहणार संगमनेर, नेमणूक लोणी पोलीस ठाणे) असे लाचखोर पोलिसांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, या प्रकरणातील फिर्यादी याचा वाळू वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. दि.२७ मे रोजी फिर्यादीचे वाहन पोलिसांनी पकडले होते.
ते सोडून देण्यासाठी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील संबंधित पोलीस नाईक भाऊसाहेब सानप याने फिर्यादी कडे दि.२७ मे रोजी ०८ वाजेच्या सुमारास तीस हजारांची रक्कम मागितली होती.
व तडजोडी पोटी वीस हजार रुपये घेण्यासाठी फिर्यादीने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष व पंचासमक्ष वीस हजार रुपये मागताना त्याचा पुरावा तयार केला आहे.
त्या प्रकरणी त्याच्या विरोधात लाचलुचपत विभागाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान लाचलुचपत विभागाने आजपर्यंत अनेक महसूल अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
व त्यांना अटक केली आहे.तरीही लाच खाण्याचे प्रमाण काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.महसूल व त्या पाठोपाठ पोलीस विभागाने आता लाच खाण्यात क्रमांक लावला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम