अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ऑफलाईन महासभेत सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे वाभाडे काढले. विषय पत्रिका आरोग्य घरभाडे या विषयासह सदस्यांनी प्रशासनाला कात्रीत पकडत निष्क्रियता समोर आणली.
दरम्यान करोना संसर्गाच्या महामारीमुळे सभा हि ऑनलाइनच्या माध्यमातून पार पडत होती. मात्र ऑफलाईन सभा घ्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती.
अखेर हि मागणी मान्य झाली व सभा ऑफलाईन घेण्यात आली. तब्बल दीड वर्षानंतर पहिल्यांदा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात सभागृृहात पार पडली.
मात्र पार पडलेली हि सभा विविध मुद्द्यावरून चांगलीच गाजली. कोविड काळात मुख्यालयात न राहणाऱ्या कर्मचारी यांच्यावरुन झेडपी सभेत प्रशासनाला धारेवर धरव्यात आले. यावेळी सदस्य राजेश परजणे, हर्षदा काकडे आकमक होते.
शिक्षक बँक, ग्रामसेवक सोसायटीचे फुकट वसुली कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला. गाव पातळीवर शासकीय कर्मचाऱ्यांना भाडोत्री घर देणाऱ्या मालकांकडून व्यावसायिक दराने ग्रामपंचायतीने कर आकारणी करावी, अशी मागणी राजेश परजणे यांनी केली.
उत्पन्न वाढून ग्रामपंचायत सक्षम होईल, असे सांगत त्यांनी जिल्हा प्रशासनाने याबाबत कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम