साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांचा माफीनामा

Published on -

औरंगाबाद : शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी हायकोर्टात माफीनामा दाखल केला. त्यामुळे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. अनिल एस. किलोर यांनी हावरे यांना बजावलेली न्यायालयाच्या अवमानाची नोटीस मागे घेतली.

संस्थानच्या वतीने खंडपीठात काम पाहण्यास हावरे यांनी मनाई केल्याचे भवर यांनी ७ नोव्हेंबर रोजी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले होते . त्यावरुन खंडपीठाने हावरे यांना न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजावण्याचा आदेश दिला होता.

सुनावणीवेळी हावरे हजर झाले नसल्यामुळे त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचा आदेश खंडपीठाने दिला होता. त्यानुसार हावरे मंगळवारी(दि.१९) खंडपीठात हजर झाले. त्यांनी खंडपीठाची बिनशर्त माफी मागीतली.

त्यावर खंडपीठाने नोटीस मागे घेऊन भविष्यात संस्थानच्या वकीलांशी थेट संपर्क न साधता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती करा, ते योग्य तो निर्णय घेतील, अशी तोंडी समज खंडपीठाने हावरे यांना दिली.

याचिकाकत्र्यातर्फे ॲड. अजिंक्य काळे व ॲड. किरण नगरकर यांनी संस्थानतर्फे ॲड. नितीन भवर, अध्यक्षांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे आणि ॲड. विक्रम धोर्डे यांनी काम पाहिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!