पोलवर काम करत असताना कर्मचाऱ्यांना बसला विजेचा शॉक

 

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होत आहे. यातच सोसाट्याचा वारा – पाऊस आदींमुळे विजेचा खोळंबा होत असतो. यादरम्यान सावधानतेने काम करावे असे आवाहन देखील महावितरणकडून करण्यात येत असते.

मात्र असेच विजेच्या पोलवर काम करत असताना एका खासगी कर्मचाऱ्याला शॉक बसल्याची घटना बेलापूर मध्ये घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर येथील विजेच्या खांबावरील मेंन्टेनन्सचे काम खाजगी ठेकेदारा मार्फत करण्यात येत होते.

त्यांच्या मार्फत गणेश भाऊसाहेब साळुंके हा पोलवर चढुन देखभाल दुरुस्तीचे काम करत होता. ज्या पोलवर काम करायचे होते त्या पोलवरील विज प्रवाह बंद करण्यात आला होता. त्या पोल शेजारीच आणखी एक विजेचा सप्लाय सुरू होता.

बंद विज प्रवाह असलेल्या पोलवरील काम आटोपुन साळुंके हा विज प्रवाह सुरु असलेल्या शेजारच्या पोलवर चढला. यावेळी साळुंकेला शॉक बसून तो खाली फेकला गेला.

जखमी अवस्थेत असलेल्या साळुंके यास तातडीने साखर कामगार हाँस्पीटल येथे दाखल केले. त्यास अति दक्षता विभागात ठेवण्यात आले असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.