घरातून घेऊन जाऊन मारहाण झालेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-  नगर शहरातील रामवाडी येथे बुधवारी सकाळी झालेल्या मारहाणीत रामवाडी येथे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कचरू दत्तू कांबळे वय ४५ रा. रामवाडी नगर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दोघांनी कांबळे यांना त्यांच्या घरी येऊन सोबत नेले. त्यांना मारहाण करून सायंकाळी घरी आणून सोडून दिले.

मारहाणीत कांबळे यांना जबर मार लागला. तसेच वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृत झालेल्या कांबळे यांचा मृतदेह आज सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात आणला होता.

पोलिसांनी सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. याबाबत मयताचे नातेवाईक यांनीतोफखाना पोलीस ठाण्यात जात आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe