अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा विरोधात आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी प्रवरा नदीपात्रात ठिय्या देत आंदोलन केले. दोन दिवसात वाळूतस्करांवर कारवाई न झाल्यास रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना निवेदनाद्वारे दिला.
प्रवरा नदीपात्रातून राजरोस अवैध वाळूउपसा होत असल्याने नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत अाहे. विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे.
अवैध वाळू उपसा विरोधात ग्रामपंचायतीने ठराव संमत करून व प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पण कारवाई होत नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला .
मंगळवारी खांडगावच्या ग्रामस्थांनी आंदोलन करत मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांना दिले. यावेळी सरपंच भरत गुंजाळ, थोरात कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ,
ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गुंजाळ, सुनील रुपवते, आप्पासाहेब गुंजाळ, संभाजी गुंजाळ, सुरेश गुंजाळ, संजय गुंजाळ, पांडुरंग गुंजाळ, सुशील गुंजाळ, रघुनाथ गुंजाळ उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम