अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून ओसरू लागली असल्याचे दिलासादायक चित्र समोर येत असताना जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण कमी होत असतानाच, बेलवंडी येथे मात्र संख्या कमी होत नसल्याने गावकरी व प्रशासन चिंतेत आहे.
तालुक्यात काष्टीनंतर आता बेलवंडी आर्थिक सुबत्ता असणारे गाव होत आहे. तेथील व्यापार, शेतीउत्पादन व राजकारण वाढत असतानाच आता कोरोनाही वाढतोय, ही चिंतेची बाब आहे. गावात आतापर्यंत कोरोनाबाधित ७०० रुग्ण आढळले आहेत.
सध्या अॅक्टिव्ह ४८ रुग्ण असून, २१ जणांना जीव गमवावा लागला आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत काही उपाययोजना केल्या; मात्र तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचे वास्तव आहे. गावात आजही ॲक्टिव्ह ४८ रुग्ण आहेत.
रुग्णसंख्या वाढण्याची कारणे शोधून गावकऱ्यांनी आता कोरोनाच्या हद्दपारीसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, शासकीय यंत्रणा गावात नेमकी काय करते, याचाही शोध घ्यावा लागणार असल्याने, अधिकाऱ्यांनी बेलवंडीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गावातील दुकानांची वेळ कमी केली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरच कमी होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम