दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- दरोड्याच्या तयारीत असलेली टोळीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले असून याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी कि, केडगाव परिसरातील एका हॉटेलजवळ काही युवक दरोड्याच्या तयारीने थांबले असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना समजली होती.

तात्काळ कोतवालीचे पोलीस पथक या दरोडेखोरांना पकडण्यासाठी सज्ज झाले. पोलीस पथकाने सापळा लावून आरोपींना अटक केली. आरोपींकडून दोन दुचाक्या, लोखंडी धारदार सत्तुर, लोखंडी गज आणि मिरची पुड असा 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणदिवे करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे : सोनू उर्फ रूपेश सुधाकर भालेराव (वय 21), रोहन सतिष शिंदे (वय 21),

कुणाल सुधाकर भालेराव (वय 19, तीघे रा. पंचशीलनगर, रेल्वेस्टेशन रोड, नगर) आणि अनुज सुधाकर उजागरे (वय 22 रा. ताराबाग कॉलनी, केडगाव) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe