अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- एका ४५ वर्षीय व्यक्तीला दोघाजणांनी घरातून उचलून नेवून जबर मारहाण केल्याने या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना नगर शहरात घडली आहे.
कचरू दत्तू कांबळे (वय ४५ रा. रामवाडी, नगर) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (दि.१४) सकाळी दोघेजण कांबळे यांना त्यांच्या रामवाडी येथील घरातून घेऊन गेले होते. त्यांना मारहाण करून सायंकाळी घरी आणून सोडले.
मारहाणीत कांबळे यांना मार लागल्याने व वेळीत उपचार न मिळाल्याने त्यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी मृत झालेल्या कांबळे यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात आणला होता.
पोलिसांनी सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. मारहाण रणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.दरम्यान, कांबळे यांना कोणत्या कारणातून मारहाण झाली,मारहाण करणाऱ्या व्यक्ती कोण? याबाबत तोफखाना पोलीस पुढीलतपास करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम