अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- अहमदनगर शहरातील नेप्ती नाका परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. कोतवाली व तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
पारनेर मधील हत्या, नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्यावरील गोळीबार या घटना ताजा असतानाच अहमनगर शहरात पुन्हा एक घातपाती कृत्य झाल्याचे समोर आले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/06/murder14.jpg)
नगर शहरातील नेप्ती नाका परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत कोतवाली व तोफखाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
अद्याप मृताची ओळख पटली नसल्याचे सांगण्यात आले असून घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
समाज एकीकडे या आजाराशी झुंज देत आहे. तर दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपली वृत्ती सोडण्यास तयार नाहीत.
पोलीस प्रशासन सध्या कोरोनाच्या संकटाशी लढत असतानाच दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पोलिसांना दुहेरी पातळीवर लढावे लागत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम