अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- एकीकडे कोरोनाच्या विळख्यातून कुठेतरी बाहेर पडत असतानाच बुरशीजन्य आजाराने आपले बस्तान बसवले आहे.
त्यामुळे कोरोनामुळे आधीच हैराण झालेल्या नागरिकांना आता बुरशीजन्य आजाराचा सामना करावा लागत आहे. मात्र हा आजार दिवसेंदिवस आपले वेगळे वेगळे रूप दाखवत आहे. सुरवातीला ब्लॅक फंगस व्हाईट फंगस येलो फंगसनंतर आता ग्रीन फंगसही सापडला आहे.
त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्रीन फंगसचा हा देशातील पहिलाच रुग्ण आहे. कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना देशात फंगसनंही थैमान घातले आहे. ग्रीन फंगसच्या पहिल्या रुग्णाची नोंद देशात झाली आहे.
इंदूरवरून विमानाने मुंबईला आणण्यात आलेल्या एका पेशंटला हा संसर्ग झाल्याचं आढळले आहे. त्या रुग्णाला काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचा संशय आल्याने त्याचं नेमकं निदान करण्यासाठी त्याची चाचणी करण्यात आली.
त्यात त्या व्यक्तीला ग्रीन फंगसचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. ग्रीन फंगसचा संसर्ग झाल्यास दिसणाऱ्या लक्षणांमध्ये नाकातून होणारा रक्तस्राव आणि ताप ही दोन प्रमुख लक्षणं आहेत. ग्रीन फंगसचा संसर्ग झाल्यास वजन मोठ्या प्रमाणात घटतं आणि अशक्तपणाही येतो.
ज्या रुग्णात पहिल्यांदा या ग्रीन फंगसच्या संसर्गाची नोंद झाली आहे, त्या रुग्णाला दोन महिन्यांपूर्वी इंदूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते . ३४ वर्षांच्या या रुग्णाच्या फुप्फुसांत कोरोनाचा १०० टक्के संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट झाले होते .
त्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात जवळपास महिनाभर उपचार सुरू होते. मंगळवारी या रुग्णाला उपचारांसाठी इंदूरवरून मुंबईला आणले तिथे तपासणी केल्यावर त्याचे सायनसेस,
फुप्फुसं आणि रक्तात ग्रीन फंगसचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाले आहे. ग्रीन फंगसचा हा देशातला पहिलाच रुग्ण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम