गायब झालेल्या पावसाने भंडारदरा आणि मुळा पाणलोट परिसरात हजेरी लावली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यातील बळीराजाला समाधान मिळवून दिले; मात्र चार दिवसांपासून वरुणराजा गायब झाला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील काही भागाला त्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान गायब झालेल्या पावसाने बुधवारी दिवशी भंडारदरा आणि मुळा पाणलोटातून पुनरागमन झाल्याने शेतकर्‍यांच्या पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत. मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर पाणलोटात मान्सूनही दाखल झाला.

दोन दिवस मान्सून सक्रिय होता. पण त्यानंतर अचानक गायब झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. बुधवारी सकाळपासून भंडारदरा आणि घाटघर व अन्य भागात रिमझिम सुरू होती. दरम्यान सायंकाळी भंडारदरात 7 मिमी पावसाची नोंद झाली.

सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 5256 दलघफू पाणीसाठा आहे. या धरणातून 840 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. खांड धरणात पुन्हा नवीन पाण्याची आवक सुरू मुळाच्या पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबित भागात रिमझीम पाऊस सुरू आहे.

त्यामुळे मुळा नदीत 300 क्युसेकने पाणी सुरू असून पिंपळगाव खांड धरणात पुन्हा नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. 600 दलघफू क्षमतेचे हे धरण निम्मे झाले असून पाऊस वाढल्यास लवकरच ते ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

दरम्यान अद्यापही जिल्ह्यात पावसाची धरसोड सुरू असल्याने आता पेरणी करावी की मोठ्या पावसाची वाट पाहावी, या द्विधा मनःस्थितीत शेतकरी आहेत. दरम्यान, पुरेसा पाऊस पडलेला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe