सभामंडपासाठी आ. पाचपुतेंच्या निधीतून १० लाखांचा निधी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- नगर तालुक्यातील वाळकी येथील श्रीराम मंदिरातील सद्गुरू (स्व.) महेंद्रनाथजी महाराज यांच्या समाधीस्थळासमोरील सभामंडपासाठी श्रीगोंद्याचे आ. बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून १० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

तशा प्रकारचे पत्र त्यांनी नाथसेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. लवकरच आता या सभामंडपाचे काम मार्गी लागणार आहे.

स्व. महेंद्रनाथजी महाराज यांच्या समाधीस्थळासमोर सभामंडपाच्या निधीसाठी नाथ सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार बबनराव पाचपुते यांची काष्टी येथे भेट घेतली.

आ. पाचपुते यांनी तत्काळ सभामंडपाच्या निधीसाठी १० लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसे पत्र त्यांनी दिले आहे.

याप्रसंगी नाथ सेवा मंडळाचे दिलीप भालसिंग, रानू आबा बोठे, मंड्याबापू झोंड, विजय खेडकर, बाळासाहेब जाधव, सचिन भालसिंग, गणेश भालसिंग, बाबू पठारे, मिठू बोठे, दिलीप झोंड आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe