नवीन वॉल टेस्टींगमुळे पाच तास पाणी वाया गेले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- प्रभाग क्र.2 मधील वसंत टेकडी जवळील फेज-2 पाईपलाईनचे काम सुरु असतांना नवीन वॉल संदेशनगरसमोर बसविण्यात आला.

शुक्रवारी (दि.18) रोजी या वॉलची टेस्टींग घेण्यासाठी सकाळी 8 वा. पाणी सोडण्यात आले. वॉलमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होते.

दुपारपर्यंत 5 तास पाणी वाया गेले, याबाबत नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी पाहणी करुन याबाबत संबंधितांना विचारणा केली व पाणी वाया जात असल्याचे सांगून याबाबत उपाययोजना करण्यात बाबत सांगितले.

यावेळी योगेश पिंपळे, बबलू सूर्यवंशी, देवीदास गुडा, रोशन करोलिया, पुष्पा राऊत आदि उपस्थित होते. अमृत अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या महत्वाच्या कामासाठी शटडाऊन काळात पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहरासह उपनगरात पाणी पुरवठा होणार नाही,

असे मनपाने पत्रक काढून जाहीर केले. मात्र वॉल टेस्टींगसाठी पाणी सोडून 5 ते 6 तास अक्षरक्ष: पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय झाला. याबाबत नगरसेवक त्र्यंबके यांनी संताप व्यक्त केला.

एकीकडे नागरिकांना पाणी नाही आणि वॉल टेस्टींगसाठी 5 तास पाणी सोडण्याची आवश्यकता का? वॉल टेस्टींग साठी अर्धातास देखील पुरेसा होता, पण मनपाच्या पाणी पुरवठा विभागात काय चालले हे कळेनासे झाले. आर.जी.सातपुते यांना संपर्क करुन माहिती घेतली असता,

त्यांनी देखील वॉल टेस्टींग, चेकिंग करता पाणी सोडले, असे उत्तर दिले. याबाबत मी आणि प्रभाग दोनच्या नगरसेविका रुपालीताई वारे, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार आयुक्तांना भेटून या प्रकाराची माहिती देणार आहे. परिसरातील नागरिकांनी वॉलवरुन पाणी नेण्यासाठी गर्दी केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe