खुशखबर ! देशवासियांना कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी एक लस मिळणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- देशात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हे एकमेव हत्यार समोर आले आहे.

आता कोरोनाच्या लढाईसाठी देशवासियांसाठी आणखी एक औषध लवकरच बाजारात येणार आहे. भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं आहे. झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी लसीची निर्मिती करण्यात आली आहे.

दरम्यान झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 व्या दिवशी तर दिसरा डोस 56 व्या दिवशी घ्यावा लागणार आहे. झायडस कॅडिलाकडून दोन डोसबाबात संशोधन सुरु आहे.

भारत सरकारनं आतापर्यंत आपत्कालीन वापरासाठी तीन कोरोना प्रतिबंधक लसींना मंजुरी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाच्या स्पुतनिक वी लसीला मंजुरीद देण्यात आली आहे.

दरम्यान झायडस कॅडिलानं डीएनए आधारित कोरोना लसीची निर्मिती केली आहे. आपात्कालीन वापरासाठी अर्ज करणारी झायडस कॅडिला ही दुसरी कंपनी आहे.

तर, डीएनएवर आधारित असणारी कोरोनावरील जगातील पहिली लस आहे. या लसीमध्ये विषाणच्या डीएनएच्या जेनेटिक कोडचा वापर करुन लसीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे लस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News