दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपींना पोलिसांकडून अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. यातच दरोडा, लुटमारी, आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे आता पोलीस देखील गुन्हेगारांना पकडण्यासाठी सक्रिय झाले आहे.

नुकतेच दोघा दरोडेखोर आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले असल्याची घटना श्रीगोंदा मध्ये घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथे २०२० साली घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी दरोडेखोर व अट्टल मोटारसायकल चोर निमकर अर्जुन काळे

(वय २२, रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) व त्याचा सहकारी अतुल उदाशा भोसले (वय २०, रा. कोळगाव, ता.श्रीगोंदा) यांना श्रीगोंदा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कोळगाव येथे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पकडले.

वरील दोन्ही आरोपींकडून निमगाव खलू, काष्टी येथून चोरीस गेलेली प्रत्येकी एक दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली.

त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर,

पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, गोकुळ इंगवले, अमोल कोतकर यांनी सहभाग घेतला. पुढील तपास संभाजी शिंदे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News