अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनासाठी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. येत्या वटपौर्णिमेपासून (ता. २४) जिल्ह्यात ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविले जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभाग याबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग यामध्ये घेतला जाणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रिय सहभागाबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग यामध्ये घेतला जाणार आहे.
नगर परिषद, नगरपंचायतीनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट :-
- श्रीरामपूर नगर परिषद – ९० हजार
- संगमनेर – ९० हजार
- कोपरगाव – ९० हजार
- राहुरी – ५० हजार
- देवळाली प्रवरा – ४० हजार
- राहाता – ३० हजार
- पाथर्डी – ३० हजार
- श्रीगोंदा – ३५ हजार
- शेवगाव – ४० हजार
- जामखेड – ४० हजार
- शिर्डी नगरपंचायत – ४० हजार
- अकोले – २० हजार
- कर्जत – ३० हजार
- पारनेर – २० हजार
- नेवासा – २५ हजार
नगर परिषद, नगरपंचायत हद्दीत लोकसहभागातून सहा लाख ७० हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. येत्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या रोप लागवडीने या अभियानाची सुरुवात होईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम