अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- भल्या पहाटे नागवडे सहकारी साखर कारखान्यावर सभासदांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. या रांगा आपला ऊस पुढच्या गळीत हंगामात पहिल्याच टप्प्यात जावा यासाठी लागल्याचे दिसून आले.
दरम्यान एका दिवसात तब्बल साडेतीन हजार सभासदांनी सव्वादोन हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद दिली. श्रोगोंद तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्यावर आजही शेतकऱ्यांचा दृढ विश्वास कायम आहे.
नागवडे कारखान्यालाच आपल्या ऊसाची नोंद असावी व तेथेच ऊस जावा, यासाठी सभासदांचा अट्टहास या रांगांमधून दिसून आला.
पुढच्या गाळप हंगामात पहिल्याच टप्प्यात ऊस जावा, यासाठी नोंदीच्या पहिल्याच दिवशी कारखाना कार्यस्थळावर मोठी गर्दी झाली होती.
पहाटे पाच वाजताच नोंद देण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. यात भीमा व घोड नदीकाठच्या गावांतील सभासदांची संख्या जास्त होती.
दरम्यान दिवसभरात तीन हजार ५०४ सभासदांनी दोन हजार २८९ हेक्टर ऊसाची नोंद दिली. या नोंदीची आता शेतकी विभागामार्फत तपासणी होऊन नंतर त्याची पक्की नोंद केली जाईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम