अडचणीत सापडलेल्या विभागनियंत्रकांनी तक्रारदाराची केली तक्रार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नगरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी नगरमध्ये येत नगरचे एसटीचे विभाग नियंत्रक विजय गिते यांची चौकशी केली.

याचा राग धरून गिते यांनी सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांची तक्रार माहिती आयुक्तांकडे केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांनी तक्रारीत म्हटले आहे की, एसटीच्या नगर विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रक विजय गिते यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना अनियमितता केली.

याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. याची दखल घेत एसटीच्या वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी नगरमध्ये येत गिते यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची चौकशी केली. तसेच गैरप्रकाराच्या अनुषंगाने जबाब घेतले.

यात चौकशी अधिकाऱ्यांनी गिते यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे, असे असतानाही गिते यांनी आपली तक्रार माहिती आयुक्तांकडे करून आपण विनाकारण माहिती मागवून त्रास देत असल्याचे म्हटले आहे.

मुळात या प्रकरणात आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे गिते अडचणीत आले असल्याने त्यांनी आकसापोटी ही तक्रार केली. त्यामुळे आपण तक्रारीची शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी घोलप यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe