अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम लंपास केली.
देवस्थानचे अध्यक्ष अशोक कोलते यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बहिरवाडी येथील कालभैरवनाथांच्या मंदिराच्या बाहेरील लोखंडी दरवाजा चोरट्यांनी तोडला.
त्यानंतर मंदिरातील दोन दानपेट्या मंदिरामागील बाजूस नेऊन तोडल्या. मंदिर बंद असून याचाच फायदा घेऊन या चोरट्यांनी या दानपेट्या फोडल्या असल्याचे शनिवारी पहाटे मंदिराचे पुजारी परभत शिंदे यांच्या निदर्शनास आले. या दानपेट्यांमध्ये अंदाजे दीड हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी एवढी वाढली आहे कि, नागरिक दहशतीखाली वावरू लागले आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहे. जीवघेणे दरोडे पडत आहे. एकीकडं हे सगळं सुरु असलं तरी वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यात जिल्हा पोलीस विभाग अपयशी ठरत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम