राजेंद्र नागवडे यांनी सभासद हिताची दखल घेतली नाही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना सन २०१९-२० मध्ये उसाअभावी बंद असल्यामुळे कारखान्याला तोटा झाला.

तो झालेला तोटा भरून काढण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम पूर्ण झालेल्या ऊस बिलाच्या माध्यमातून शासनाने जाहीर केलेली एफआरपी कमी करून द्यावी, अशी मागणी नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी शासनाकडे करणे सभासदाच्या हिताचे नाही.

यासाठी आपण विरोध केला असल्याची माहिती माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी दिली. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक केशव मगर म्हणाले, सन २०१९-२० मध्ये तालुक्याच्या भोवतालचे सर्व कारखाने उसाअभावी बंद होते.

परंतु आपल्या तालुक्यात कारखाना चालेल असा नदीपट्यासह इतर बागायत भागात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होता. त्यामधून किमान तीन लाख टन उसाचे गाळप झाले असते.

यासाठी आपण कारखाना सुरू करा, अशी मागणी करून सुद्धा अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सभासद हिताची दखल घेतली नाही. म्हणून कारखान्याला गेल्यावर्षी तोटा झाला आणि तो तोटा भरून काढण्यासाठी यंदा उसाचे चांगले गाळप झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe