अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- काेराेना आजाराने थैमान घातलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सदर आजारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जीवघेण्या आजाराने तालुक्यातील अनेकांचे बळी घेतले, कोरोना लॉकडाउनमुळे आर्थिक जीवनमान अडचणीत सापडले.
अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा न करता संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जनतेस घरी रहा सुरक्षित रहा, स्वत: बरोबरच कुटुंबाची काळजी घ्या,
सामाजिक अंतर पाळा व जास्तीत जास्त नैसर्गिक प्राणवायू मिळवण्यांसाठी सर्वांनी आपल्या घराशेजारी, परिसरात, गावात, वाड्या वस्त्यावर, जेथे जेथे रिकाम्या जागा असतील तेथे तेथे वृक्षारोपण करावे, असे आवाहन केले.
बिपीन कोल्हे वाढदिवसदिनी २१ जुन रोजी बाहेरगावी असल्याने ते भेटू शकणार नाही. त्यांच्याप्रती असलेल्या सदिच्छा वृध्दींगत करण्यांसाठी सर्वांनी वरील आवाहनाचे काटेकोरपणे पालन करून वाढदिवसानिमीत्त हार,तुरे, शाली,
श्रीफळ आदींवर खर्च न करता सदर रक्कमेचा विनीयोग गरीब, तसेच रुग्णांना आर्थीक मदत करून करावा, शाळा सुरू होतील तेव्हा हुशार गरीब विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले.
करून वाढदिवसानिमीत्त हार,तुरे, शाली, श्रीफळ आदींवर खर्च न करता सदर रक्कमेचा विनीयोग गरीब, तसेच रुग्णांना आर्थीक मदत करून करावा, शाळा सुरू होतील तेव्हा हुशार गरीब विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम