अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- आमदार सदाभाऊ खोत यांनी नुकतीच दिनांक २० जून २०२१ रोजी आदर्शगाव हिवरे बाजारला भेट दिली यावेळी त्यांनी विविध विकास कामाची पहाणी करून माहिती घेतली पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमध्ये केलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी बोलताना आमदार खोत पुढे म्हणाले, दुष्काळमुक्तीचा हिवरे बाजारचा संदेश देशातील तरुणाईने घेतल्यास मोठी चळवळ निर्माण होईल.

दुष्काळमुक्त गाव गाव,हिरवळीने नटलेले गाव,व्यसनमुक्त गाव,विकासाभिमुख गाव जणू पृथ्वीवर स्वर्ग अवतरावा असा गाव एक तपस्वीच करू शकतो
हे पाहिल्यानंतर गावाला समृद्ध करणारे पोपटराव पवार यांच्या व्यक्तीमत्वाच्या प्रेरणेतून लाखोजन तयार होतील आणि समृध्द भारत बलशाली भारत निर्माण होऊन या देशाला प्रगतीपथावर नेणारे युवक निर्माण होतील असे उदगार खोत यांनी हिवरे बाजार भेटीत काढले.
हिवरे बाजार ग्रामस्थांतर्फे खोत यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी एस.टी.पादीर(सर) ,रो.ना.पादीर(ग्रा.प.सदस्य) व ग्रामस्थ उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम












