सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- सोन्याचांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर व्यवहार बंद होत असताना देखील सोन्याचे दर कमी झाले होते.

याठिकाणी ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 158.00 रुपयांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा दर प्रति तोळा 46,800 रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीच्या वायदे किंमतीतही (Silver Price Today) किरकोळ घसरण झाली आहे. जुलैच्या डिलिव्हरीच्या चांदीचे दर 19 रुपयांनी कमी होऊन 67,580.00 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाले आहेत.

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली होती. अमेरिकेत सोन्याचा दर 12.47 डॉलरने घसरला आहे, यानंतर सोन्याचे दर 1,764.31 डॉलर प्रति औंस या स्तरावर बंद झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News