कर्नलच्या घरातून चक्क दारूच्या बाटल्यांची चोरी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-  सध्या नागरिकांना कोरोना सोबत अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच सध्या अनेक भागात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे.

यात मोठ्या प्रमाणात सोन्याची दागिने, रोख रक्कम आदीची चोरी केली जात आहे. मात्र नगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.

तो म्हणजे चोरटयांनी चक्क एका कर्नलच्या घरातून दारूच्या बाटल्याच चोरल्या आहेत. याबाबत सविस्तर असे कि, गोविंदपुरा येथील इक्रा शाळेजवळील कर्नल अमरसिंग मान हे राहतात.

दरम्यान दि. १७ जून रोजी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरातील ओल्डमन कंपनीच्या रम दारुच्या २ बाटल्या, ब्लेंडर स्प्राईट कंपनीची बाटली,

किंगफिशर बिअर, अमृत कंपनीच्या दारुच्या बाटल्या आदी प्रकारच्या तब्बल १७ हजार ९५८ रुपयांच्या दारुच्या बाटल्या लंपास केल्या.

याबाबत कर्नल अमरसिंग मान यांच्या घरातील महिला स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या कुसूम मारुती मेरड यांच्या हा प्रकार लक्ष्यात आला.

मेरड यांच्या फिर्यादीनुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ. गोर्डे हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News