शेताच्या वादातून एकावर कोयत्याने केले वार !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- आज अनेक ठिकाणी जमिनीच्या वादातून सखे भाऊ एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. असा प्रकार घडला असून, तू शेतात व विहरीजवळ यायचे नाही, असे म्हणून भावकितील तिघांनी मिळून एका ७० वर्षीय वृद्धास लाकडी काठी, लोखंडी गज व कोयत्याने मारून जखमी करीत कुटुंबाला खल्लास करण्याची धमकी दिली.

ही घटना सांगोला तालुक्यात घडली असून जखमी झालेल्या गणपत रंगनाथ मेटकरी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गणपत रंगनाथ मेटकरी हे शुक्रवारी शेतातील विहरीवर उसाला पाणी देण्याकरिता गेले होते.

त्यावेळी भावकितील नारायण मेटकरी, शशिकांत मेटकरी व अंजना मेटकरी यांनी सदर येऊन फिर्यादिस तू शेतात व विहरीजवळ यायचे नाही, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी सुरू केली असता गणपत मेटकरी यांनी तुम्ही कोण मला येऊ नका म्हणणारे,

असे म्हणत असताना यापैकी नारायण मेटकरी याने काठीने, शशिकांत मेटकरी याने लोखंडी गजाने तर मंगल मेटकरी हिने हातातील ऊस तोडण्यासाठी वापरावयाच्या कोयत्याने मारून जखमी केले. दरम्यान, फिर्यादी इसम जखमी अवस्थेत खाली पडला असता वरील तिघांनी आम्ही तुला जिवंत ठेवत नाही,

तुझ्या सगळ्या कुटुंबाला खल्लास करणार, असा दम देऊन निघून गेले. याबाबत नारायण नामदेव मेटकरी, शशिकांत नारायण मेटकरी, अंजना नारायण मेटकरी यांचे विरुद्ध गणपत रंगनाथ मेटकरी यांनी सांगोला पोलीसात गुन्हा केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News