अवघ्या 35 मिनिटांत चार्ज होणारा हा स्मार्टफोन लाँच,जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Ahmednagarlive24
Published:

वृत्तसंस्था :- रियलमी कंपनीने भारतात ‘रिअलमी एक्स२ प्रो’ आणि ‘रिअलमी ५ एस’ हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

‘रिअलमीचा एक्स२ प्रो’ स्मार्टफोनमध्ये ५० w सुपर व्हीओओसी फ्लॅश चार्ज टेक्नॉलजी दिली आहे. स्मार्टफोनमध्ये ४,००० एमएच बॅटरी दिली फक्त अर्ध्या तासात फोन फुल्ल चार्ज होणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 4,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, पबजी खेळता खेळताही फोन ८० टक्के चार्ज होणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

Realme X2 Pro च्या रिअरमध्ये 4 कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनच्या बॅकमध्ये मेन कॅमरा 64 मेगापिक्सलचा आहे. त्याशिवाय, फोनच्या बॅकमध्ये  8, 13 आणि 2 मेगापिक्सलचे इतरही कॅमेरे देण्यात आला आहे.

Realme X2 Pro मध्ये 90 Hz अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये FHD+ रिझॉल्यूशनसोबत 6.5 इंचाची सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे.

या फोनची स्क्रिन 2.5D गोरिल्ला ग्लास 5 ने तयार करण्यात आली आहे.स्मार्टफोनमध्ये ९० एचझेड अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले दिला आहे. तसंच, एफएचडी+ रिझोल्यूशनसोबत ६.५ इंच सुपर अल्मोड स्क्रीन दिली आहे.

क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर दिला आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत ३३, ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत २९, ९९९ किंमत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment