अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आधार कार्ड घेऊन त्या त्यानंतर अंगठा घेवून खातेदारांचे पैसे अदा करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केली.
राष्ट्रीयकृत बँकाकडून विशेषत: भारतीय स्टेट बँक, बडोदा बँक, सेन्ट्रल बँक यांच्याकडून वरील योजना वर्षाभरापासून राबवण्यात येत असून आपली बँक आशिया खंडातील एक नंबरची बँक असून वरील योजना आपल्या बँकेने अमलात आणावी.
कारण आपल्या बँकेतील खातेदार मोठ्या प्रमाणात आहे. वरील योजना राबवल्यामुळे बँकेची स्टेशनरी व वेळ वाचणार आहे.
व खातेदारांचाही या योजनेमुळे फायदा होणार आहे. याबाबत अधिक माहिती की, बँकेला आधार कार्ड दाखवल्यानंतर आधार कार्डामुळे खात्यात किती रक्कम आहे
हे समजते व खातेदाराला बँकेच्या कर्मचाऱ्याकडून किती पैसे हवेत हे विचारल्यामुळे आपणास किती रक्कम हवी हे समजते. आपल्या बँकेकडे ऊस उत्पादक सभासद, श्रावण बाळ योजनेतील खातेदार (ज्येष्ठ नागरिक व महिला),
हे सुद्धा खातेदार आहे. वरील योजनेमुळे खातेदारांचा फायदा होणार आहे. बँकेचाही वेळ वाचणार आहे. बँकेने या मागणीची दखल घेऊन योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम