श्रीगोंदे शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : राहुल जगताप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-कोरोना काळात इतर विकास कामांना कात्री लागत असतानाही श्रीगोंदे नगरपालिका नगराध्यक्ष शुभांगी पोटे, गटनेते मनोहर पोटे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे जिह्यातील मंत्री, तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते यांच्या मदतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये निधी मिळवला.

भविष्यात देखील निधी मिळवू आणि शहर विकसित करू, असे प्रतिपादन माजी आमदार तथा जिल्हा बँक संचालक राहुल जगताप यांनी केले. श्रीगाेंद्यात १४ व्या वित्त आयोगातील विकासकामे अंतर्गत भूमिगत गटार योजना शुभारंभ जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे होते. आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, दीपक भोसले, हरिदास शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

जगताप म्हणाले, कोरोना काळात ग्रामपंचायतीला निधी आलेला परत जाण्याची वेळ आली. विकास कामांना कात्री लावण्यात आली. पण पोटे दाम्पत्याने शहर विकासासाठी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावले. या भागात रस्त्यासाठी निधी मिळवला.

गटारीचा प्रश्न मार्गी लागला. राजेंद्र नागवडे म्हणाले, पोटे दाम्पत्य सर्व नेते, सर्व नगरसेवक यांना विकास कामात बरोबर घेऊन काम करत आहेत. कोरोना काळात देखील शहर विकासकामे सुरू आहेत. आमदार बबनराव पाचपुते म्हणााले, निधी मिळत आहे.

कामे करा, पण आपण शहराच्या विकासासाठी बागबगीच्यासाठी आणलेल्या साडेसात कोटी रुपयांचे काय झाले. शहरातील रस्त्यांसाठी ३३ कोटी रुपये आणले. त्याचेही काम अर्धवट आहे.

त्यासाठी सर्वांना बरोबर घ्या, असे सांगितले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, संतोष खेतमाळीस, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, नगरसेवक गणेश भोस, राजू लोखंडे, सतीश मखरे, निसार बेपारी आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe