गटविकासअधिकाऱ्यास चक्क जीवे मारण्याची धमकी! बाजार समितीच्या ‘त्या’ माजी सभापतीला अटक ….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-ग्रामपंचायतमधील अनियमित काम केल्या प्रकरणी सरपंचावर अपात्रेची कारवाई करण्या संदर्भात प्रस्ताव का केला? अशी विचारणा करत.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना बाजार समितीचे माजी सभापती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा

यांनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन अधिकाऱ्यावर बुट फिरकवल्या प्रकरणी नाहाटा याच्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणीव्यंकनाथ ग्रामपंचायतीतील विकासकामात अनियमितता असल्याची तक्रार येथील एका नागरिकाने केली होती. त्या आधारे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी चौकशी अहवाल तयार केला.

आणि सरपंच रामदास ठोंबरे यांच्यावर अपात्रेची कारवाई संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. ही गोष्ट बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांना समजली.

नंतर ते पंचायत समितीत आले आणि गटविकास अधिकारी काळे यांना म्हणाले की,  तुम्ही आमच्याच सरपंचावर अपात्रेची का करता.

यावेळी  दोघांची शाब्दिक चकमक झाली. नाहाटा काळे यांच्या अंगावर धावत शिवीगाळ करत दमबाजी केली आणि त्यांच्यावर बुट फिरकवत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

नंतर गटविकास अधिकारी काळे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात धाव घेत नाहाटा यांच्या विरोधात फिर्याद दिली.

त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून नाहाटा यांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe