कुटुंबात तुंबळ हाणामारी,दोघांना अटक : परस्परविरोधी फिर्याद दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नगर तालुक्यातील इमामपूर येथे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली असून, एमआयडीसी पोलिस स्टेशनला परस्परविरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत.

ही घटना रविवार दि.२० रोजी घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, भगवान बाजीराव बोठे( वय २६ रा. इमामपूर) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे

फिर्यादीची आई इमामपूर येथील गट नंबर २८६ मधील शेतातील बांधाच्या बाभळी तोडत असताना तुकाराम यशवंत टिमकरे, उदय रामदास टिमकरे, रामदास तुकाराम टिमकरे यांनी शिवीगाळ केली.

तेव्हा फिर्यादी हॉटेल हनुमान येथे विचारण्यासाठी गेले असता वरील तिघांनी लोखंडी गज, स्टंप व दांडक्याने उजव्या खांद्यावर पाठीत व हातावर मारहाण करून जखमी केले, अशा आशयाची फिर्याद दिली आहे.

तर दुसरी फिर्याद रामदास तुकाराम टिमकरे (वय ४२ रा. इमामपूर) यांनी दिली आहे. त्यामध्ये फिर्यादीचे वडील इमामपूर शिवारातील नगर औरंगाबाद रोडवर असलेल्या हॉटेल हनुमान येथे असताना माझ्या वडिलांना तुम्ही हॉटेलची जागा सोडून द्या,

ती आमची आहे असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच भगवान बोठे याने कोयत्याने उजव्या कानाच्या खाली खांद्यावर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

यावरुन बाजीराव भानुदास बोठे, बबन बाजीराव बोठे, भगवान बाजीराव बोठे, मिठु बाजीराव बोठे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe