बाळासाहेब नाहाटा यांनी केले गंभीर आरोप म्हणाले राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याचे बाहुले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- गटविकास अधिकाऱ्यावर बूट फेकून मारण्याची घटना श्रीगोंदा तालुका पंचायत समितीत घडली. या प्रकरणी राज्य बाजार समितीचे संचालक आणि लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाचे वडील बाळासाहेब नहाटा यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत आता नाहाटा यांनी स्पष्टीकरण देत धक्कादायक असे आरोप केले आहेत, मी कोरोना काळात श्रीगोंदा तालुक्यातील जनतेचे जीव वाचवण्यासाठी मी काम केले आहे. माझे काम सहन न झाल्याने काहींचे पोटशूळ उठला आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर अधिकाऱ्यांचा गैरकारभार उघड केल्याने राजकीय आकसातून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला अटक झाली नसून मी स्वतः अटक झालो आहे.

प्रसशासनाच्या या दबावाविरोधात मी आमरण उपोषण सुरू केले असून अन्न पाणी व औषध सुद्धा घेणार नाही, असे बाळासाहेब नाहाटा यांनी कळविले आहे. हा गुन्हा दाखल करण्यात तालुक्यातील राजकीय पुढाऱ्याचा हात असून,

तहसीलदार व गटविकास अधिकारी हे राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याचे हाताचे बाहुले बनले आहेत, असे नाहाटा यांनी सांगितले. लोणी ग्रामपंचायतमधील काही विकास कामात अनियमितता असल्याने नाहाटा यांनी माझ्यावर बूट उगारला हा आरोप निराधार असून,

प्रशासन मंत्री व नेते माझ्या पाठीशी आहेत, तुम्हाला गावचा कारभार करून देणार नाही, असे बोलून गटविकास अधिकारी काळे यांनी मला जाणीवपूर्वक भडकवले, असे नाहाटा यांनी कळवले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आढावा बैठकीत वादळी भूमिका मांडल्याने तालुक्यातील एका राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याने जाणीवपूर्वक सत्तेचा गैरवापर करून आपल्याला यात गुंतवले आहे.

राज्यातील मोठे नेते जर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणेसाठी दबाव आणत असतील तर ही बाब निषेधार्ह आहे. काळे यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासल्यास कोण सूत्रधार आहे हे उघड होईल, असेही नाहाटा म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe