श्रीरामपूर शहरात तरुणावर बिबट्याचा हल्ला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.०७ सुर्यनगर या भागातील बिबट्याचे दर्शन घडल्याची घटना ताजी असतांनाच श्रीरामपूर तालुक्यांतील सरला बेट परिसरातील गोवर्धन येथील ऋषीकेश चव्हाण या मोटारसायकल वरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला केल्याची घटना घडली.

बिबट्याने पुन्हा भिती निर्माण झालेली आहे.गोदावरी नदी परिसर असल्याने पूर्वीही या परिसरात बिबट्याचा वावर होता.

येथील शेतकरी बापु जगताप यांच्या उसाजवळ एक चपळ बिबट्या हा लिंबाखाली बसलेला होता; त्यावेळेस ऋषी चव्हाण हा दुध घालून घरी परत जात असताना त्याच्या गाडीवर झेप घेवून बिबट्याने हल्ला केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe