अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- आदिवासींच्या विविध मागण्यासांठी विविध ठिकाणचे आदिवासी बांधव हे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या निवासस्थानी आले होते.
मात्र आमदार लहामटे हे अनुउपस्थित राहिल्याने संतप्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने लहामटे यांचा निषेध नोंदविण्यात आला.
संतप्त आदिवासी बांधवांनी राजूर येथील आमदार लहामटे यांच्या घरावर काळा झेंडा फडकविला.आपण आदिवासींच्या आरक्षित जागेवर निवडून आले असून तुम्ही आदिवासींचे प्रश्न सोडविणार नसल्यास आपल्याला त्या पदावर राहण्याचा मुळीच आधिकार नाही.
आज तुम्ही प्रश्नाला सामोरे जाण्याऐवजी आम्हाला टाळून मुंबईला निघून जाता, त्याबद्दल तुमचा निषेध करून यापुढील निवडणुकीत तुम्हाला आदिवासी समाज उत्तर देईल, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव
यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांना दिला. याबाबतचे निवेदन लहामटे यांच्या पत्नी सौ. पुष्पाताई लहामटे यांना निवेदन दिले.
आदिवासींच्या समस्या सोडवण्यास राज्यातील आमदार, खासदार अपयशी ठरले असल्याने त्यांच्या विरोधात व त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी जनाधिकार उलगुलान करण्यात आले.
राज्यातील पहिले आंदोलन तालुक्यातील राजूर येथे करण्यात आले. उद्यापासून प्रत्येक आदिवासी आमदारांच्या दारावर मोर्चा काढणाऱ असल्याचे जाधव म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम