अखेर राम शिंदे यांनी दिली कबूली म्हणाले हो मी अजित पवार यांना भेटलो होतो ! पण…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपली भेट झाल्याचे प्रा. शिंदे यांनी अखेर मान्य केले आहे. याबाबत स्पष्टीकरण त्यांनी आता दिले आहे.

राम शिंदे याबाबत बोलताना म्हणाले मी पवार यांना भेटलो मात्र, ती भेट राजकीय नव्हती. आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आपण गेलो होतो. तसे अजित पवार यांनी लग्नाला येण्याचे मान्यही केले होते.

मात्र, ऐनवेळी कामामुळे त्यांचा दौरा रद्द झाला, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले. ‘राज्यात महाविकास आघाडीचे एकत्रित नव्हे तर तीन पक्षांची तीन सरकारे कार्यरत असल्याची स्थिती आहे. कोण मंत्री काय निर्णय घेतोय, कोणता अधिकार कोणाला आहे,

याचा कशाचाही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने कारभार करीत आहेत,’ अशी टीका भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. भाजपच्या ओबीसी आरक्षण बचावतर्फे २६ जून रोजी राज्यात एकाचवेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

त्याची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहरजिल्हाध्यक्ष भय्या गंधे, ज्ञानेश्वर काळे यावेळी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe