अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क न घालणारे आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरूद्ध जोमाने मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सार्वजिनक ठिकाणी नियमांचे उलंघन करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील जास्त असल्याचे या कारवाईच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. थुंकीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होते.
त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ९ हजार ३१२ जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत २० लाख ४८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ३० हजार ४५८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसताच जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले होते.
रुग्णसंख्या घटल्याने सध्या सर्व व्यवहार सुरळीत असले तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे यांसह इतर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर सातत्याने कारवाई सुरू आहे.
मात्र नागरिक तरीही जबाबदारीने वागत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांची बेफिकीरी तिसर्या लाटेला आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम