अगस्ती कारखान्यास मदतीबाबत अजित पवारांच्या जिल्हा बँकेला सूचना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- सततच्या होणाऱ्या आरोपांना कंटाळून अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.

मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार व महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी ‘अगस्ति’सुरु राहान्यासाठी सर्वेतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्या मुळे संचालक मंडळाने दिलेले राजीनामे नामंजूर करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर यांनी पत्रकार परिषेदत दिली.

आ. डॉ. किरण लहामटे, अशोकराव भांगरे, सीताराम पाटील गायकर, प्रकाश मालुंजकर, मीननाथ पांडे, अमित भांगरे, यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व अगस्ति च्या सद्य स्थिती बाबत चर्चा केली.

तसेच इथेनॉल प्रकल्प सुरु करण्यात आल्याची माहितीही पवार यांना देण्यात आली. यानंतर अजित पवार यानी जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके यांना फोन वरून अगस्ति ला मदत करण्याची सूचना केली.

त्यानंतर ना.थोरात यांचीही या शिष्ठ मंडळाने भेट घेतली.अगस्ति पुढील अडचणी त्यांच्या समोर मांडण्यात आल्या. त्यांनीही अगस्ति साठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.

राज्यात कारखाने बंद पडत असतांना अगस्ति बंद पडु नये म्हणून शरद पवार, अजित पवार,बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने ‘अगस्ति’ ला सातत्याने मदत करण्याचे धोरण घेतले असल्याचे गायकर यांनी स्पष्ठ केले.

अगस्ति कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषेदत बोलताना गायकर म्हणाले की-अगस्ति च्या संचालक मंडळाने राजीनामे दिल्यानंतर उस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर व्यापारी,कामगार यांच्यात उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या.

अगस्ति कारखाना सुरु झाला पाहिजे,तो टिकला पाहिजे त्यादृष्टिने सुकानु समन्वय समितीच्या बैठकीत अगस्ति बाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

कारखान्यास मदत करण्याचे धोरण स्विकारले. त्याबद्दल अगस्ति च्या संचालक मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन व स्वागत गायकर यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe