अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :-मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी अजून दोन आठवड्याची मुदतवाढ शासनाच्या वतीने मागीतली आहे.
यामुळे दोन आठवड्यानंतर अधिकृत विश्वस्त मंडळाची यादी सादर करणार असल्याचे शासनाच्या वकीलांनी सांगीतल्याने उधाण आलेल्या चर्चाना पुर्णविराम लागला आहे.
साईसंस्थान अध्यक्ष उपाध्यक्ष,विश्वस्त निवडीसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू होती.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या वतीने निवड झालेल्या सदस्यांवर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हार तुरे, आतिषबाजी करत अभिनंदनाचा वर्षाव केला.
मात्र काल सायंकाळी मा.उच्च न्यायालयात सरकारी पक्षाच्या वकिलांनी अजुन दोन आठवड्याची मुदतवाढ घेतल्याने विश्वस्तपदासाठीची चुरस वाढली असून दोन आठवड्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
न्यायालयाने सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीची नोंद घेत साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विश्वस्थ मंडळ नियुक्ती संदर्भात अधिसूचना जाहीर कारणासाठी राज्य शासनास २ आठवड्याची मुदतवाढ दिली. दरम्यान पुढील सुनावणी ५ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम